अविनाश इंगावले
गेवराई-येथील वकील संघाच्या वतीने मागील चार दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले असून दसऱ्याच्या दिवशीही हे आंदोलन गेवराईत सुरु आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन यांच्या उदासीनतेमुळे अद्याप या आंदोलनावर तोडगा निघाला नाही.
गेवराई शहरात नवीन न्यायलयाची ईमारत आहे ती अद्याप सुरू नाही.तसेच न्यायलयाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य असून यामुळे वकील बांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकवेळा स्वच्छतेबाबत नगरपालिकेला निवेदन देऊन ही यावर तोडगा निघत नाही. त्यामुळे प्रलंबित मागण्यावर वकील संघाने चार दिवसापासून काम बंद आंदोलन सुरु केले असून दसऱ्याच्या पाचव्या दिवशीही हे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान दोन दिवसापूर्वी माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वकिलांच्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र अद्याप या आंदोलनावर तोडगा निघाला नसून वकील संघाचे ऐन सणासुदीत आंदोलन सुरुच आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होतं नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहिलं असे वकील संघाचे अध्यक्ष अॅड अमित मुळे यांनी प्रजापत्रला बोलताना सांगितले.