Advertisement

तर राजीनामा देईल आणि दोन पंडित निवडून येणार नाहीत याची खबरदारी घेईल

प्रजापत्र | Thursday, 14/10/2021
बातमी शेअर करा

गेवराई-राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसली आहेत.हेक्टरी १० हजारांची मदत शेतकऱ्यांची बोळवण करणारी असून शेतकऱ्यांसाठी गरज भासल्यास आमदारकीचा राजीनामा देईल मात्र त्यानंतर गेवराई मतदारसंघातून दोन पंडित निवडून येणार नाहीत याची खबरदारी देखील घेईल असा इशारा आ.लक्ष्मण पवार यांनी गेवराईच्या विराट मोर्चात दिला.

   

         गेवराईत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'शेतकरी संताप मोर्चा' काढण्यात आला होता.यावेळी प्रकाश सुरवसे,जे.डी.शहा,राजेंद्र मोटे,पप्पु गायकवाड,संतोष सुतार,परमेश्वर वाघमोडे,याहिया खान यांची उपस्थिती होती.गेल्या महिनाभरापुर्वी शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.महाविकास आघाडी सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढल्याची टीका करत तिघाडी सरकारची हेक्टरी दहा हजारांची मदत तुटपूंजी असल्याचे आ.पवार म्हणाले.हेक्टरी ५० हजार मदत अपेक्षित असताना सरकारने केलेली मदत अपुरी असून गरज भासल्यास शेतकऱ्यांसाठी राजीनामा देईल आणि दोन पंडित निवडून येणार नाहीत याची खबरदारी घेईल असे आ.पवार म्हणाले.गेवराईत आ.लक्ष्मण पवार यांच्या मोर्च्यात शेतकऱ्यांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.दरम्यान या मोर्च्याने संपूर्ण शहर दणाणून गेले होते.  

 

Advertisement

Advertisement