Advertisement

'त्या' महिलेचा खुन करून मृत्युदेह लपवला 

प्रजापत्र | Thursday, 07/10/2021
बातमी शेअर करा

अविनाश इंगावले 

गेवराई दि.७ -राष्ट्रीय महामार्गालगत असना-या राजंणी गावच्या  नालीत एका महिलेचा मृत्युदेह साडीत गूंडाळून टाकण्यात आला होता मात्र या महिलेची ओळख पटत नव्हती परंतू जालना पोलीसात एक महिला बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती त्या ठिकाणी संपर्क करून या महिलेच्या अंगावरील दागिने व साडी यावरून ओळख पटवली होती परंतू हा मृत्यु झाला कसा ? याचं कोड सुटत नव्हतं परंतू रात्री उशीरा या बाबद नातेवाईक यांच्या तक्रारीवरून गेवराई पोलीसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे , 

    या बाबद अधिक माहिती अशी की , राधाबाई माणिकराव गायकवाड ( वय ३४ ) वर्ष असे मयत झालेल्या महिलेचे नाव असुन या महिलेचा मृत्युदेह राष्ट्रीय महामार्ग राजणी गावालगतच्या नालीत सापडला परंतू हा मृत्युदेह ओळख पटेल असा नव्हता फक्त सांगाडा होता याच महिलेचा आत्याचा मुलगा यांच्या सोबत ही महिला गेली होती तसेच दि २२ सप्टेबर पासुन बेपत्ता होती मात्र महिलेच्या भाऊ याने आपल्या बहिनीला आत्याच्या मुलगा घेऊन गेला होता असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे  . परंतू गेवराई पोलीसांनी सदर महिलेचा खुन केला असल्याचा अंदाज वर्तविला होता मात्र तो अंदाज खरा ठरला असुन रात्री उशीरा या प्रकरणी गेवराई पोलीसांत प्रकाश देविदास दुनगहू ( वय ३३ वर्ष ) इंदेवाडी जालना यांच्या तक्रारी वरून सुभाष शेरे रा हातरखेड ता..अंबड जि.जालना यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी फरार आहे.संबंधित घटनेचा पुढील तपास गेवराई पोलीस ठाण्याचे स.पो.नी. संदीप काळे हे करत आहेत.

Advertisement

Advertisement