Advertisement

ट्रॅक्टरवर बसुन जिल्हाधीकारी भोजगावात पोहचले

प्रजापत्र | Wednesday, 29/09/2021
बातमी शेअर करा

 

अविनाश इंगावले 

गेवराई दि २९ ( वार्ताहार ) गेल्या दोन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे भोजगाव येथील पुल क्रॉस करत असतांना एक तरूण पाण्यात वाहून गेल्याची घटना गेवराई तालुक्यातील भोजगाव याठिकाणी घडली होती याच ठिकाणी आज जिल्हाधीकारी राधा बिनोद शर्मा यांनी भेट दिली व मयताच्या पन्तीला स्पॉटवरच चार लाखांचा धनादेश दिला .
 
    याबाबद अधीक माहिती अशी कि , सुदर्शन संदिपान संत ( वय ३४ वर्ष ) राहणार भोजगाव तालुका गेवराई जि बीड हा तरूण भोजगाव येथील रस्ता क्रॉस करत असतांना पाण्यात पडला व वाहून गेला त्यांच्या मृतूदेह धोंडराई जवळ आढळुन आला गेल्या दोन वर्षापासुन याठिकाणच्या पुल अर्धवटच आहे या गावचा संपर्क देखील तुटलेला आहे अश्या बिकट अवस्था या गावांची आहे तरूण मयत झाल्यानंतर गावंकरी यांनी धोंडराई च्या राष्ट्रीय महामार्गावर प्रेत ठेऊन चार तासठिय्या अंदोलनास बसले होत जोपर्यंत जिल्हाधीकारी स्वत; येत नाहीत तो पर्यंत आम्ही उठानार नाहीत असा पवित्रा त्यांनी घेतला होता त्यानंतर स्थानिक महसुल च्या तहसिलदार यांनी जिल्हाधीकारी यांना फोनवरून माहिती दिली व जिल्हाधीकारी व स्थानिक लोकप्रतिनीधी यांच्या विनंतीला मान देऊन सदरचे अंदोलन गावंकरी यांनी थांबवले व आज घटनेच्या दोन दिवसानंतर स्वत; जिल्हाधीकारी राधा विनोद शर्मा यांनी भोजगावला भेट दिली गावांत जाताना त्यांनी टॅक्टरचा प्रवास करत भोजगाव गाठले गावकंरी यांच्या समस्या जानुन घेतल्या तसेच मयताच्या पत्नीला चार लाखांचा धनादे श स्पॉटवरच दिला व संबंधीत पुलाचे काम लवकर पुर्ण करण्यासंदर्भातल्या सुचना प्रशासनाला दिल्या यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर , प्रभारी तहसिलदार रामदासी , मंडळ अधीकारी बाळासाहेब पखाले , तलाठी राजेश राठोड , यांच्यासह अनेक विभागाचे कर्मचारी उपस्तिथ होते .

Advertisement

Advertisement