Advertisement

चोरीच्या संशयावरून जमावाचा पारधी वस्तीवर हल्ला

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

पाटोदा : तालुक्यातील पारनेर येथे चोरीच्या संशयावरून जमावाने पारधी वस्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन वर्षांचा बालक ठार झाला तर आठ ते दहा जण जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली. 

चोरी केल्याच्या संशयावरून शनिवारी रात्री ४० ते ५० जणांच्या जमावाने पारधी वस्तीवर हल्ला चढविला. या हल्ल्यात गानू अरुण काळे या दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. यावेळी ८ ते १० व्यक्ती जखमीही झाल्या असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमीपैकी एका चार वर्षीय मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे पारनेर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मयत मुलाच्या नातेवाईकांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisement

Advertisement