Advertisement

बिबट्याने फस्त केल्या अकरा शेळ्या

प्रजापत्र | Friday, 25/07/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२५(प्रतिनिधी): तालुक्यातील वांगी परिसरात बालासाहेब गोरख हाडूळे या शेतकर्‍याच्या अकरा शेळ्या ह्या बिबट्याने ठार मारल्या आहेत.हि घटना आज शुक्रवार (दि.२५) रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे.

       यापूर्वीही बिबट्याने एका वासराचा बळी घेतला होता तर आज शुक्रवार (दि.२५) रोजी सकाळी ११ च्या सुमारास अकरा शेळ्या बिबट्याने ठार मारल्या घटना घडली असून वांगी, शिवणी, काठोडा, भवानवाडी, कुटेवाडी, जरुड, बाभळखुंटा, बोरफडी, हिवरा, मौजवाडी, मौज, बकरवाडी,घाटसावळी,पोखरी,मैंदा या गावातील गावकरी व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी शेती कामे करताना काळजी घ्या व आपले जनावरेही सुरक्षित ठेवावी.संबंधित घटनेबाबत वन विभागाशी संपर्क झाला असून शेतकरी बांधवांनी सतर्क राहून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement