Advertisement

अखेर मंदिरे उघडणार

प्रजापत्र | Friday, 24/09/2021
बातमी शेअर करा

मुंबई-नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या करोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
तसेच, धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.
तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्यााचा आता घेतलेला निर्णय म्हणजे, एकप्रकारे उशिरा सुचलेले शहाणपण..आहे. असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपाकडून ठाकरे सरकारविरोधात राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. शिवाय, वेळोवेळी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका देखील केली जात होती. अखेर मंदिर खुली करण्याचा मुहूर्त आता निघाला असल्याचे दिसत आहे.

 

Advertisement

Advertisement