नागपूर, 24 सप्टेंबर : महाराष्ट्रावर आता विजेचे संकट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसामुळे कोळशाची प्रचंड मोठी टंचाई निर्माण झाली आहे. महानिर्मितीकडे 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. वेगवेगळ्या औष्णिक केंद्रावरचे पाच संच कोळसा अभावी बंद झाले आहेत. त्यामुळे राज्यासमोर पुन्हा एकदा लोडशेडिंगचं संकट उभ राहिलं आहे.
औष्णिक केंद्रांवरचे पाच संच कोळसा अभावी बंद
कोरडी औष्णिक केंद्राचे ६२० मेगावॅटचे युनिट ६ बंद
चंद्रपूर युनिट ४ बंद
नाशिक युनिट युनिट ५ बंद
खापरखेडा युनिट १ आणि २ हे सर्व संच आपत्कालीन परिस्थितीत बंद
वेकोलीकडून महानिर्मिती २५ रॅक ऐवजी १८ रॅक कोळसा पुरवठा होत होता. आता तो १० रॅकपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे राज्यातील सात ऊर्जानिर्मिती केंद्रावरील वीज निर्मिती प्रभावित झाले आहे. सततच्या पावसामुळे कोळसा उत्खनन बंद असून राखीव साठा संपत आल्याने हे संकट निर्माण झाले आहे.
राज्यात एकूण सात सात केंद्रांवर वीज निर्मिती होते. यामध्ये चंद्रपूर, खापरखेडा, परळी, भुसावळ, नाशिक आणि पारस या सात केंद्रांचा समावेश आहे.