पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी गुजरातमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. भूपेंद्र पटेल यांनी आज (सोमवार) राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल झालेला नाही.आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
बातमी शेअर करा