अहमदनगर : केडगाव येथे राहणारी 10 वर्षांची मैथिली ही शाळेत हुशार होती. बॅडमिंटन आणि पोहण्यात तिने नैपुण्य मिळविले होते. तिला विविध स्पर्धांत अनेक पारितोषिके मिळवली होती. तिच्या घरात ही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. परंतु एका घटनेने संपूर्ण केडगाव हादरले..या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्या घटनेने संपूर्ण केडगाव हादरले...
केडगाव उपनगरातील अथर्वनगरमध्ये सोमवारी (ता. ६) सकाळी ही घटना उघडकीस आली. संदीप दिनकर फाटक (वय ४२), किरण संदीप फाटक (वय ३२) आणि मैथिली संदीप फाटक (वय १०) अशी कुटुंबियांची नावे असून संदीप फाटक हे कुटुंब मूळचे सारोळा कासार (ता. नगर) येथील रहिवासी. त्यांचे वडील कामधंद्यानिमित्त केडगाव उपनगरात स्थायिक झाले. संदीप यांचे नगर-दौंड महामार्गावर कायनेटिक चौकात औषधाचे दुकान होते. त्यांचा २००८ मध्ये मामाची मुलगी किरण हिच्याशी विवाह झाला होता. या दाम्पत्याला मैथिली (वय १०) ही मुलगी होती. त्यांनी औषधाचे दुकान भाड्याने दिले होते. त्यानंतर एका कंपनीची जिल्ह्याची एजन्सी घेतली होती. या एजन्सीबरोबरच जिल्ह्यातील किराणा दुकानांना ते साहित्य पोच करत होते. कोरोना लॉकडाउनमध्ये त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत होती.
खिडकीतून आत डोकावून पाहिले असता बसला धक्का
केडगावातील देवी मंदिर भागातील अथर्वनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात ते होते. फाटक दाम्पत्याने रविवारी (ता. ५) नातेवाईक, मित्रपरिवाराला फोन केले. त्यानंतर मुलगी मैथिली हिला फाशी देऊन मारले. त्यानंतर संजय आणि किरण या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या एजन्सीमध्ये कामाला असलेला मुलगा सोमवारी (ता. ६) सकाळी घरी गेला. त्यावेळी घर बंद होते. त्याने मोबाईलवर संपर्क केला असता रिंग जात होती; परंतु फोन घेतला जात नव्हता. त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता मृतदेह आढळून आले. त्याने ही माहिती शेजारी राहणाऱ्यांना दिली.
अकोले येथील विशाखा ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीच्या रम्य आठवणी, मनावर कोरली गेलेली जीवनमूल्ये, भावनोत्कट प्रसंग आदी लेकीला अलिकडेच पत्राद्वारे सांगितल्या आहेत. मुलगी सुगी हिला रोज एक पत्र व त्यासोबत स्वतः तयार केलेली कलाकृती अशी दुहेरी भेट त्यांनी सलग पन्नास दिवस दिली. हेतू होता मनात घर करून राहिलेल्या बालपणीच्या आठवणी लेखनाच्या माध्यमातून संग्रहित करण्याचा.
एक चिठ्ठीसुद्धा आढळून आली
शेजारील रहिवाशांनी ही माहिती कोतवाली पोलिसांना दिली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर घटनास्थळी आले. या ठिकाणी एक चिठ्ठीसुद्धा आढळून आली आहे. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यात नमूद केले आहे. या आत्महत्याप्रकरणी कोणालाही दोषी धरू नये, असेही चिठ्ठीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. किरण हिच्या हस्ताक्षरातील ही चिठ्ठी आहे. त्यावर दोघांच्या सह्या आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात तिघांची उत्तरीय तपासणी इन कॅमेरा करण्यात आली. डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू गळफासामुळे झाल्याचे नमूद केले आहे. मुलगी मैथिली हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिला गळफास देऊन आई-वडिलांनी खून केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्यामुळे याप्रकरणी मृत्यू झालेल्या आई-वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मैथिली उत्कृष्ट खेळाडू
मैथिली ही शाळेत हुशार होती. बॅडमिंटन आणि पोहण्यात तिने नैपुण्य मिळविले होते. तिला विविध स्पर्धांत अनेक पारितोषिके मिळाली आहेत. तिच्या घरात ही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.