अविनाश इंगावले
गेवराई दि २ - तालुक्यातील डीबी पथकांतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यातील नऊ मोटारसायकल जप्त करण्यात गेवराई पोलिसाना यश मिळाले आहे . संपुर्ण जिल्ह्यात मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे लक्षात आल्यानंतर बीड पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात डीबी पथकाची स्थापना केली होती . या पथकातील प्रमूख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी करण्यात आलेल्या नऊ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत .
या बाबत सविस्तर माहिती अशी कि ,किरण तात्यासाहेब कोल्हारे ( वय २६ वर्ष ) रा भांबेरी ता. अंबड जि . जालना ह. मु. देवपिंप्री ता. गेवराई जि. बीड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असुन तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या मोटारसायल गेल्या असल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या आहेत मात्र आरोपीचा शोध लागत नव्हता मात्र गस्त घालत असतांना एका खब-यांच्या माहितीवरून एका व्यक्ती कडे चोरीच्या मोटार सायकल आहेत अशी माहिती गेवराई पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रफूल्ल साबळे यांना मिळाली असता त्यानी तात्काळ टीम तयार करून उमापूर परिसरात गेले असता त्या ठिकाणी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दिसुन आला त्यांनी त्यास तात्काळ ताब्यात घेतले चौकशी दरम्यान आपण मोटरसायल चोरतो अशी कबूली आरोपीने दिली व त्यांच्याकडील नऊ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटार सायकल मिळून आल्या असून अंदाजे चार लाखं रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आर . राजा व पोलीस निरीक्षक रविंद्र पेरगूलवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख सहा-पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे , स. फौ. उबाळे , पो. हे. देशमुख , पो. हे. जायभाये पो. कॉ. काळे यांनी केली असुन पुढील तपास सहा-पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे करत आहेत .