Advertisement

पर्यायी पूल गेला वाहून

प्रजापत्र | Tuesday, 24/08/2021
बातमी शेअर करा

 

गेवराई -माजलगाव या रस्त्यावरील गोळेगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंद झाली होती. कंत्राटदाराकडून पूल पुर्ववत करण्याचे काम चालू आहे.

 

 

बागपिंपळगांव ते सावरगाव या राज्यमार्ग ५० रस्त्याचे काम सुरु आहे. जवळपास १५० कोटी रुपये निधी असलेल्या या रस्त्यावर असलेल्या नदी नाल्यांवरील पुलांचेही बांधकाम सुरु आहे. गोळेगांव येथील शिंगरी नाल्यावरील पुलाचे काम सुरु असल्याने या नाल्यावर नळ्या टाकून पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती. या पुलावरुन वाहतूक सुरू होती. पण सोमवारी रात्री तालुक्यात चांगला पाऊस पडला. या पावसामुळे गोळेगांव जवळील नदीला पूर आला होता. या पुरात या रस्त्यावर बनवलेला पर्यायी पुल वाहुन गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक दिवसभर बंदच होती. महत्वाचा मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ असते. पण दिवसभर पर्यायी पुलाचे काम चालू असल्याने वाहतूक बंदच होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊन वाहतुकदारांचा चांगलाच गोंधळ उडाला.

 

 

Advertisement

Advertisement