Advertisement

गेवराई उपजिल्हा रुग्णालयात लोपोची शस्त्रकिया

प्रजापत्र | Friday, 20/08/2021
बातमी शेअर करा

 

 

गेवराई दि २० ( वार्ताहार ) शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अंगावरील तसेच पाठ व पोटावरिल छोट्याश्या गाठी असतात अश्या लोपो नामक शस्त्रक्रिया अवघ्या पंधरा मिनीटामध्ये होऊ लागल्या आहेत . त्यामुळे  नागरिकांत समाधान व्यक्त होऊ लागले  
अनेक नागरिकांना अंगावरती चरबीच्या छोट्या गाठी असतात परंतू ऑपरेशन खर्च परवडत नसल्याने याकडे नागरिक कानाडोळा करतात यांचा परिणाम अनेकदा जिवावर देखील बेतला जातो यातून कॅन्सर सारख्या आजाराला देखील सामोरे जावे लागते मात्र  डॉ महादेव चिंचोळे यांनी पदभार स्विकारल्यापासुन 
 अनेक रुग्णालयातील उपचारांच्या सुविधा रुग्णांना मिळत असल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये  समाधानाचे वातावरण दिसून येत आहे .
 

 

 

 नागरिकांनी निसंकोच पणे येऊन लोपोची शस्त्रक्रिया करावी - डॉ महादेव चिंचोळे 
अनेक नागरिकांना अंगावरिल छोट्या गाठी असतात त्या वेदनादाईपण असतात पण सर्वसामान्य नागरिकांना यासाठी खाजगी रुग्णालयात दहा हजार रूपये मोजावे लागतात परंतू कोणत्याही रूग्णांनी अश्या गाठी काढण्यासाठी गेवराई उपजिल्हा रूग्णलयात यावे आणि मोफत शस्रक्रीया करावी असे अवाहन गेवराई उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सांगितले आहे .

 

 

Advertisement

Advertisement