गेवराई दि १८ ( वार्ताहार ) तालुक्यातील राक्षसभूवनमध्ये मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी करण्यात येत आहे दररोज याठिकाणाहून शेकडोब्रास वाळू उपसा करून त्यांची वाहतूक केली जात आहे गेल्या दोन दिवसांपुर्वी गेवराई महसुलच्या कर्मचारी यांनी याठिकाणी झापा मारला व शंभरब्रास वाळू साठा जप्त केला आहे तिन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे .
या बाबद सविस्तर माहिती अशी की, गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे हे तिन दिवसांच्या रजेवर आहेत याचाच फायदा वाळू माफिया उचलत आहेत तहसिलदार रजेवर जाताच राक्षसभूवनमध्ये केनी आणि जेसीबीच्या साह्याने शेकडो ब्रासचा साठा चोरून नेण्यासाठी जमा करण्यात आला होता यांची कुनकून उपविभागीय अधीकारी नामदेव टिळेकर यांना झाल्यानंतर त्यांनी स्वत: गेवराई महसुलला याबाबद कार्यवाई करण्याचे आदेश दिले गेवराई महसुलने कार्यवाई केली परंतू यात कोणत्याही माफियांचे नाव यात घेतले नाही परंतू याबाबद जेव्हा विचारना होऊ लागल्या त्यामुळे रात्री उशीरा राक्षसभूवन सज्जाचे तलाठी गोविंद ढाकणे यांनी चंकलाबा पोलीसांत शंभर ब्रास वाळू उपसा केल्याबाबद दोन आज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चंकलाबा पोलीस करत आहेत .