राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी ठाकरे सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण दिलं जाणार असल्याची घोषणा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री योशमती ठाकूर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज कॅबिनेट बैठक पार पडली. बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात राज्यातील अनाथ बालकं आणि एकल महिलांसाठी महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्यानं अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी राज्य सरकारनं घेतली होती. त्यानंतर आता अनाथ बालकांच्या भविष्याच्या दृष्टीनं त्यांना नोकरी आणि शिक्षणात १ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकल महिलांसाठी हॉस्टेल्स उभारणार
राज्यात नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह ही केंद्र पुरस्कृत सुधारित योजना राज्यात राबवली जाणार आहे. तसंच राज्यात महिलांसाठी ५० हॉस्टेल्स उभारली जाणार असल्याचीही माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा...
हॉटेल, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
https://prajapatra.com/2872