बीड-राज्यात डेल्टाप्लस रुग्णांमध्ये वाढ झाली असून आता ही संख्या २१ वरून ४५ वर गेली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ४५ रुग्णा पैकी २७ पुरुष आणि 18 स्त्रियांना याची लागण झाली आहे.रत्नागिरी, जळगाव, ठाणे, मुंबई, पुणे याठिकाणी हे रुग्ण आढळले.दरम्यान मराठवाड्यात देखील या व्हेरियंट चा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्ण आढळल्याची माहिती देखील राजेश टोपे यांनी दिली.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना आता डेल्टाचा एक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यापुढे जिल्हावासियांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असून कोरोनाच्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.
बातमी शेअर करा