राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ८ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज कोणते नियम शिथिल केले जाणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून आहे. उपाहारगृहांना व उपनगरी रेल्वे प्रवासाला परवानगी देण्याबाबत पुढील आठवड्यात आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दिले होते.
मुंबई, ठाण्यासह २५ जिल्ह्यांमधील करोना निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. नव्या नियमावलीनुसार शॉपिंग मॉलसह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु आहेत. रविवारी दुकाने, मॉल बंद राहतील. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र शक्य असेल्यास वर्क फ्रॉम होम सुरु ठेवावं, असं सांगितलं होतं. सर्व कृषी उपक्रम, बांधकामे, औद्योगिक कामे, माल वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरु केलं आहे. व्यायामशाळा, योग केंद्रे, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा सुरु ५० टक्के क्षमतेने सुरु आहेत. मात्र एसीचा वापर करता येत नाही. रविवारी ही सेवा बंद असणार आहे. मात्र, रुग्णसंख्या जास्त असलेल्या पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम आहेत. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, अहमदनगर आणि बीड अशा ११ जिल्ह्यांत सध्याचे निर्बंध कायम आहेत.
दुकानांच्या वेळा वाढविण्यात आल्या असल्या तरी उपाहारगृहांच्या वेळेत बदल करण्यात आलेला नाही. प्रचलित वेळेनुसार दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने उपाहारगृहे सुरू ठेवले आहेत. घरपोच सेवेसाठी रात्रीपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांची वेळ रात्री १० पर्यंत वाढविण्याची संघटनेची मागणी आहे.
हेही वाचा...
६५ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
http://prajapatra.com/2849