Advertisement

 धारूरमध्ये एकाची खाजगी माहितीसह १ लाख ३८ हजार हडपले

प्रजापत्र | Thursday, 05/08/2021
बातमी शेअर करा

 किल्लेधारूर-एका ॲपचा वापर करुन जमा केलेले पेमेंट पेंडीग राहिल्यानंतर अनोळखी मोबाईल वरुन आलेल्या कॉलने वापरकर्त्याच्या वैयक्तिक डाटासह तब्बल १ लाख ३८७४४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना शहरात घडली. याप्रकरणी धारुर पोलिसात   गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सध्या दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक सुविधा असल्यामुळे मोबाईल मध्ये वेगवेगळ्या ॲपचा सर्रास वापर होतो. बँकीची कामेही मोबाईलमुळे सोपी झाली असून शासनस्तरावरही ॲप वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. मात्र यामुळे फसवणूकीचा धोकाही वाढला असून सतत ऑनलाईन फसवणूकीच्या तक्रारी नोंदवल्या जात आहेत.
              धारुर शहरातील लक्ष्मी नगर भागात राहणाऱ्या दत्ता ताराचंद अडाने या राधाकृष्ण नगर, लातूर येथील मुळ रहिवासी असणाऱ्या व्यक्तीची फसवणूक झाल्याची तक्रार धारुर पोलिसात नोंदवण्यात आली आहे. फिर्यादी अडाने हे नोकरदार असून CRED APP चा वापर करताना (SBI CREDIT CARD) क्रेडीट कार्डचे जमा केलेले पेमेंट जमा न होता पेंडिग राहिले होते. याचाच फायदा घेत आनोळखी आरोपीने CRED APP कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे भासवून 8756116181 या मोबाईल क्रमांकावरुन दोन वेळा फिर्यादीस फोन केला.

 

अडाने यांना एसबीआय क्रेडीट कार्डचे जमा केलेले पेमेंट जमा करतो म्हणून वापरत असलेल्या ॲपचा ओटीपी व गुगल कोड हस्तगत केला. आरोपीने त्याआधारावर अडाने यांचा मोबाईल हॕक करत त्यांचा गुगल ड्राईव्ह आणि जीमेलवरचा डाटा चोरुन घेत CRED application मधून ९० हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच क्रेडीट कार्डवरील ४८ हजार ७४४ रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले.
अडाने यांची १ लाख ३८,७४४ रुपयांची फसवणूक करत संपुर्ण माहिती चोरली. याप्रकरणी धारुर पोलिसात फसवणूकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या फसवणूक करणाऱ्याच्या मोबाईल क्रमांकावरुन सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

हेही वाचा... 

कोरोनाचा आकडा दोनशेच्या घरात 
 http://prajapatra.com/2826

Advertisement

Advertisement