Advertisement

 नदीच्या पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यु 

प्रजापत्र | Saturday, 20/09/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.२० (प्रतिनिधी): तालुक्यातील कुंभारवाडी येथील कांबळी नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने गुरूवार (दि.१८) रोजी एका महिलेचा मृत्यु झाला आहे.

        आष्टी तालुक्यातील कुंभारवाडी जवळच असलेल्या धानोरा या गावात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात असलेल्या चंद्रकला विनायक बोकडे (वय ७०) ह्या कांबळी नदी पार करत असताना पाय घसरून पडल्या असता त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्यावर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून कुंभारवाडी येथील स्मशानाभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

Advertisement

Advertisement