Advertisement

माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

प्रजापत्र | Friday, 30/07/2021
बातमी शेअर करा

बीड दि. ३० – माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खाजगी सुमारास रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ९४ वर्षाचे होते.

 

                      विधानसभेवर एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळेस त्यांनी विक्रमी विजय मिळविला होता.
                       दरम्यान २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले

Advertisement

Advertisement