Advertisement

मीराबाई चानूने पटकावले सिल्व्हर मेडल

प्रजापत्र | Saturday, 24/07/2021
बातमी शेअर करा

टोकियो – ऑलम्पिक स्पर्धेत भारताने खाते उघडले असून वेटलिफ्टिंग मध्ये भारताच्या मीराबाई चानू हिने ४९ किलो गटात सिल्व्हर मेडल मिळवत भारताला यश मिळवून दिले. टोकयो ऑलिम्पिकमध्ये  वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताची अनुभवी खेळाडू मीराबाई चानूनं  इतिहास रचला आहे. तिने ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकले आहे.या ऑलिम्पिकमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं मेडल आहे.चानूनं स्नॅच गटातील पहिल्या प्रयत्नात ८४ किलो वजन यशस्वी उचलले. दुसऱ्या प्रयत्नात ८७ किलो यशस्वी वजन उचलल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात ८९ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्यानंतर क्लीन अँड जर्क गटामध्ये तिने जोरदार कामगिरी करत मेडल जिंकले.

 

 

चानू यावेळी ४९ किलो वजनी गटामध्ये सहभागी झाली होती. पाच वर्षांपूर्वी रिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येही माीराबाईकडून पदकाची मोठी अपेक्षा होती. त्या ऑलिम्पिकमध्ये मीराबाईनं निराश केलं होतं. त्या स्पर्धेत तिला सहा प्रयत्नात फक्त एकच वेळी वजन उचलण्यात यश मिळाले होते.

Advertisement

Advertisement