महाड- येथे संपूर्ण शहराला ढगफुटीमुळे पाण्याने वेढा घातला असून अनेक लोकं यामध्ये अडकले आहेत.शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास नागरिकांना वाचविण्यासाठी भारतीय नौदलाचे जवान दाखल झाले असून महाडमध्ये विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या महाडमध्ये हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्नाची पाकिटं देण्याचं यासोबतच पाण्यात कुणी अडकलं आहे का याची पाहणी हेलिकॉप्टरद्वारे सुरू आहे.गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आणि नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास दोन मजल्यापर्यंत पाणी आल्याची परिस्थिती होती. सध्या महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून नागरिकांचा संपर्क तुटला आहे.गेल्या दोन ते तीन दिवसांपासून संपूर्ण महाडमध्ये वीज पुरवठा बंद झाल्याने अनेकांचा संपर्क होत नसल्याचे चित्र आहे.दरम्यान गुरुवारी रात्री महाडमधील एमआयडीसी कारखान्यांमध्ये रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर कारखान्याला भीषण आग लागली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे समोर आले नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.सध्या जवानांच्या वतीने बचावकार्य सुरु आहे.