यवतमाळ-जिल्ह्यातील महागाव परिसरामध्ये ४.४ रिस्टर स्केलच्या भूकंपाचे रविवारी (दि.११) धक्के बसले. त्याचे पडसाद हिंगोलीपर्यंत पोहचले होते.तर नांदेद शहारत ही काळी साडे आठ वाजता मालेगाव रोड, छत्रपती चौक, गणेश नगर भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे जनतेमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील महागाव परिसरात भूगर्भातून मोठा आवाज येत होते. याचा परीघ जवळपास १५० किमी पर्यंत होता. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व हिंगोली तालुक्यातील अनेक गावांमध्ये या धक्क्यामुळे धरणीकंप जाणवला. तसेच नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील अनेक गावामध्ये, शेजारी असलेल्या वसमत तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवले.
बातमी शेअर करा