Advertisement

अखेर पंकजा मुंडेंनी सोडले मौन

प्रजापत्र | Friday, 09/07/2021
बातमी शेअर करा

मुंबई-केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच झाला. त्यामध्ये श्री. भागवत कराड यांनी केंद्रीय राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यावरून मुंडे भगिणींवर अन्याय झाला, असा सूर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांची वर्णी लागेल, अशी चर्चा रंगली होती. त्या दिल्लीलाही गेल्याच्या बातम्याही येत होत्या. त्यावर "आम्ही नाराज नाही. होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा", असं स्पष्टीकरणं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्या भावूक झालेल्या दिसल्या.

 

 

"नियुक्त झालेल्या मंत्र्यांना शुभेच्छा देते. मी नाराज असण्याचं कारण नाही. मी अभिनंदनांची ट्विट करावसं वाटलं नाही. मुंडे साहेबांमुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे, त्यामुळे आम्हाला मंत्री पद मिळावं, अशी लोकांची अपेक्षा असतात. लोकांशी असलेलं नातं कधीच तुटत नाही. पक्षश्रेष्ठींनी नव्या लोकांना संधी दिली, त्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. त्यामुळे होणाऱ्या चर्चांना विराम द्यावा", असे स्पष्टीकरण भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिलं. 
मी राजकारणात व्यवसाय म्हणून नाही, तर व्रत म्हणून आले आहे. भाजपला मला संपवायचं आहे, असं मला वाटत नाही. वंजारी समाजातील कोणताही नेता असला मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. प्रीतम मुंडे यांना पद मिळालं नाही म्हणून नाराज नाही. मी पक्षावर निष्ठा ठेवणारी कार्यकर्ती आहे. भाजपला टीम नरेंद्र आणि टीम देवेंद्र मान्य नाही", असं मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे. "आम्ही केलेले कष्ट हे पक्षासाठीच केलेले आहेत. मी खूप भाग्यवान आहे मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले. महाराष्ट्राचा नेता असतो. तो कोणत्या जातीचा नेता नसतो. त्यामुळे ओबीसीचा नेता असं म्हणणं बोलण योग्य नाही. आम्ही दोघींना कधीही मंत्री पदाची मागणी केलेली नाही. त्यामुळे नव्याने मंत्रीपद मिळणाऱ्या नेत्यांनी माझ्या शुभेच्छा आहेत", अस मत पंकजा मुंडेंनी व्यक्त केले आहे. 

 

फडणवीस काय म्हणाले? 
नाशिक महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस शहरात गेले असता पत्रकारांनी त्यांना मुंडे भगिणीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला, "मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात", असे देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. 

 

शिवसेना काय म्हणते?
श्री भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेच्या सावलीत वाढले. पण, प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे. हाच खरा धक्कातंत्राचा प्रकार आहे", असं शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून म्हंटलं आहे. 

 

Advertisement

Advertisement