Advertisement

दोन वर्ष झाले रस्ता पूर्ण होईना                 

प्रजापत्र | Friday, 09/07/2021
बातमी शेअर करा

 

 शिरूर दि.९ (वार्ताहार)-चिंचपूर ते नवगण राजुरी रस्त्याला २०१९ मध्ये सुरुवात झाली.आज दोन वर्षानंतर ही या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.ठिकठिकाणी काम अर्धवट अवस्थेत असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यासाठी आता भाजपचे तालुका सरचिटणीस एम.एन.बडे यांनी सर्वपक्षीय आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. 
         मागील दोन वर्षांपासून या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने अपघाताची मालिका सुरु असून जुलै महिना सुरु झाला असताना ही हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही.सदरील कामाबाबत गुत्तेदाराची उदासीनता वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरू लागली असून येत्या पाच दिवसांत या रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास भाजपचे तालुका सरचिटणीस एम.एन.बडे यांनी सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा दिला आहे.       

 

चौकट
सहनशिलता संपली
दोन वर्षानंतर ही चिंचपूर ते नवगण राजुरी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.वेळावेळी या रस्त्यासाठी संबंधित गुत्तेदारांना निवेदन देऊन काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.मात्र अद्याप या मागणीची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही.अर्धवट रस्त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात घडले असून अनेकांना जीव ही गमवावा लागला आहे.आता आमच्या सहनशिलतेची मर्यादा संपली आहे.येत्या पाच दिवसांत काम सुरु न झाल्यास आमच्या रोषाला संबंधितांना सामोरे जावे लागले  
एम.एन.बडे (तालुका सरचिटणीस,शिरूर)

Advertisement

Advertisement