Advertisement

तहसिलदार तलाठी यांना धक्काबूक्की करून हायवा पळवला

प्रजापत्र | Thursday, 08/07/2021
बातमी शेअर करा

 अविनाश इंगावले 
गेवराई दि ६ ( वार्ताहार ) तालुक्यात अवैध वाहतुक करणारी जड वाहने यांच्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे तसेच गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या नदिपात्रात संचारबंदी लागू करण्यात आले आहेत वाळू उपस्या विरोधात माझ्याककडे कोणतीही तक्रार किंवा फोनही आला तर त्याठिकाणच्या उपवविभागीय अधीकारी व तहसिलदार यांच्यावर कार्यवाई केली जाईल असे आदेश आयुक्त सुनिल केद्रेकर यांनी काढले आहेत याच अंनुषगाने गेवराई महसुलने वाळु माफिया विरोधात आपली कंबर कसली आहे व आज सकाळी दहाच्या दरम्यान राजंणी जवळ गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे व तलाठी परम काळे यांना माफिया कडून धक्काबूक्की करण्यात आली होती नंतर तहसिलदार हे बीड याठिकाणी मिटींग साठी गेले याठिकाणी   पोलीस व महसुल कर्मचारी यांच्या उपस्थितीथ असतांना  हायवा पळवला या प्रकरणी गेवराई पोलीसांत भाजपाचे नगर सेवकांसह चार जनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदरची घटना ही ( दि ६ जुलै ) रोजी घडली होती 

   या बाबद अधिक माहिती अशी कि  , वाळुचा हायवा हा राष्ट्रीय महामार्गावरून चालला असल्याची माहिती गेवराईचे तहसिलदार सचिन खाडे यांना मिळाली त्यानंतर लगेच सहकारी तलाठी परम काळे यांना घेऊन गढीच्या दिशेने रवाना झाले सदरील वाळुची गाडी मोठ्या स्पीडने वेगात हायवेवरून सुसाट  निघाली गढी पासुन राजंणी पर्यंत तहसिलदार यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला व सदरची हायवा गाडी पकडली परंतू चालकाला विचारले असता त्याच्याकडे विनारॉयल्टी चालला असल्याचे निदर्शनास आले व त्यांने मालकाला फोन केला व त्याठिकाणी एक स्कॉपिर्यो भरूण माफिया आले व तहसिलदार सचिन खाडे व तलाठी परम काळे यांच्यासोबत हूज्जत घालु लागले तहसिलदार यांनी त्यांना न जुमानता हायवा पळवून नेण्याचे मनसुबे उधळून लावले होते हायवा ताब्यात घेतली याच दरम्यान तहसिलदार सचिन खाडे व तलाठी परम काळे यांना धक्काबूक्की माफियांनी केली तसेच सदरचा हायवाची चावी चालक घेऊन पसार झाला व हायवा गाडी राजंणी याठिकाणी लावलेली असुन त्याठिकाणी महसुलचे काही कर्मचारी थांबले होते .

    घटनास्थळी तहसीलदार यांनी गेवराई पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन हायवामध्ये एक पोलिस व एक महसूल कर्मचारी बसवून तो हायवा तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले होते. मात्र वाळू माफियांनी हा हायवा दोन्ही कर्मचाऱ्यांना धमकावून मध्येच खाली उतरवून सिनेस्टाईल पळवला. याप्रकरणी भाजपाचे नगर सेवक राहुल खंडागळे सह चार जणांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तहसीलदार सचिन खाडे यांनी सांगितले. तर संबंधीत टिप्परचालकाने हायवा मोठ्या स्पीडने पळवल्याने पोलिस व महसूल कर्मचारी घाबरून खाली उतरले. यानंतर चालकाने टिप्पर पळवले, आमच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला, परंतु यामध्ये त्यांना यश आले नाही, असे पोलिस निरीक्षक रविंद्र पेरगुलवार यांनी सांगितले

Advertisement

Advertisement