नवी दिल्ली-गर्भवती महिलांनाही आता कोरोनावरील लस घेता ( covid vaccine for pregnant women ) येणार आहे. NTAGI च्या शिफारशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्वीकारल्या ( covid vaccine ) आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NTAGI च्या म्हणजेच नॅशनल टेक्निकल अॅडवायजरी ग्रुप ऑन इम्युनायजेशनच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. गर्मभवती महिलाही आता कोविनवर नोंदणी करून किंवा थेट कोविड लसीकरण केंद्रावर जाऊन आता लस घेऊ शकतात.
कोरोनाच्या संसर्गाने गर्भवती महिलांच्या आरोग्यवरही विपरित परिणाम होत होता. तसंच महिलांना अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत होता. पोटातील बाळावारही परिणाम होण्याची शक्यता होती. इतर महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांना करोनाच्या गंभीर संसर्गाचा धोका अधिक आहे. कोरोना संसर्ग झालेल्या महिलांमध्ये वेळेपूर्वीच प्रसूतीचा धोकाही आहे, असं अभ्यासातून समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिला गर्भवस्थेच्या कुठल्याही टप्प्यावर कोरोनावरील लस घेऊ शकतात, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.