Advertisement

मुलाच्या मारहाणीनंतर आईचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 20/06/2021
बातमी शेअर करा

शिरूर कासार-तालुक्यातील  घाटशिळ-पारगाव येथे हृदयाला पिळवटून टाकणारी घटना रविवारी सकाळी समोर आली आहे.मुलाने केलेल्या मारहाणीत जन्मदाती आईचा मृत्यु झाला असून वडील गंभीर जखमी झाले आहेत.फादर्स डेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

 

        शिरूर कासार तालुक्यातील घाटशिळ पारगाव येथील बाबासाहेब खेडकर या विकृत व्यक्तीने आपल्या आई-वडिलांना शनिवारी सायंकाळी चारच्या दरम्यान काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीची ही घटना घडत असतानाचा गावातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यानंतर रविवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने घाटशिळ पारगावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेतून बाबासाहेब खेडकर यांचा विकृतपणा चव्हाट्यावर आला आहे.

 

 

या मारहाण प्रकरणी अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.बाबासाहेब खेडकर हा काठीने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण करतानाचे दृश्य या व्हिडिओमध्ये दिसत आहे. कृत्य तो सतत अधून मधून करत असतो असे येथील काही ग्रामस्थांनी सांगितले. मात्र नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यामध्ये बाबासाहेब खेडकर याची आई शिवबाई खेडकर यांचा मृत्यू झाला आहे. तर वडील नगर येथील दवाखान्यात उपचार घेत असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

तात्काळ चौकशी करू
ले व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओची तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. हा प्रकार खेदजनक असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

 

Advertisement

Advertisement