Advertisement

देशात लसीकरणानंतर ४८८ जणांचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 14/06/2021
बातमी शेअर करा

 मुंबई-कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आहेत. वैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अ‍ॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.

 

 

           आकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचं प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर केवळ ०.०१ टक्के लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. आणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर १४३ दिवसांच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. तर लस घेणाऱ्या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झालाय.
सरकारी आखडेवारीनुसार एईएफआयच्या २६ हजार २०० प्रकरणांपैकी दोन टक्के लोकांचा म्हणजेच ४८८ जणांचा मृत्यू झालाय. मरण पावणाऱ्यांमध्ये ३०१ पुरुष आणि १७८ महिलांचा समावेश आहे. यापैकी नऊ जण महिला आहेत की पुरुष हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. मरण पावलेल्यांपैकी ४५७ जणांना कोविशिल्डचा डोस देण्यात आला होता. तर कोव्हॅक्सिनचा डोस घेणाऱ्या २० जणांचा मृत्यू झालाय. ११ जणांनी नक्की कोणती लस घेतली होती याची माहिती देण्यात आलेली नाही.

 

 

 

Advertisement

Advertisement