अंबाजोगाई-बीएसएनएल ऑफिसमधून बोलत असून तुमचे केवायसी करायचे असल्याचे सांगून एका अँपच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यास ५० हजाराला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.९) गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबाजोगाईतील वैद्यकीय अधिकारी श्रीकांत चौधरी यांच्या मोबाईलवर फोन करून केवायसी करायचे असल्याचे सांगत त्यासाठी बीएसएनएलचे एक अँप डाऊनलोड करायला सांगितले.यानंतर त्यांच्या खात्यातून तब्ब्ल ५० हजार रुपये लंपास करण्यात आले.यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अंबाजोगाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा