Advertisement

मुख्य आरोपी भैय्या गायकवाड गजाआड

प्रजापत्र | Tuesday, 01/06/2021
बातमी शेअर करा

शिरूर-  येथील सराफा व्यावसायिक विशाल कुलथे  यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी मंगळवार (दि.१) पाहटे नाशिक येथून ताब्यात घेतले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी केली.

 

 

शिरूर येथील विशाल कुलथे या सराफा  व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील मास्टर माईंड ज्ञानेश्वर गायकवाड आणि त्याचे साथीदार धीरज मानकर व केतन लोमटे यांची नावे समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

 

 

 त्यांना न्यायालयाने २८ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. तर यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर (भैय्या) गायकवाड पोलीस शोध घेत होती. अखेर मंगळवारी पहाटे नाशिक येथून त्यास  ताब्यात घेतले ही कारवाई पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी,अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख भारत राऊत व त्यांच्या टीमने त्यांनी केली.

Advertisement

Advertisement