Advertisement

आता दिवसाला १ कोटी नागरिकांचे होणार लसीकरण 

प्रजापत्र | Monday, 31/05/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील भयानक  स्थिती आणि तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली असताना आता केंद्र सरकारने कंबर कसली आहे. रोज १ कोटी नागरिकांना लस देण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून या योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यात आहे. या योजनेनुसार लसींच्या ३० ते ३२ कोटी डोसची उपलब्ध निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय.

 

 

 

या योजनेनुसार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचे २५ कोटी डोस प्रत्येक महिन्याला  उपलब्ध करून दिले जातील, असं बोललं जातंय. याशिवाय ५ ते ७ कोटी डोस दुसऱ्या लसींचे पुरवले जातील. यात बायोलॉजिकल ई, सीरमची नोवावॅक्स, जिनोव्हा एमआरएनए, जायडस कॅडीला डीएनए आणि स्पुतनिक या लसींचाही समावेश आहे.

 

 

देशात गेल्या एप्रिल महिन्यात ७५ हजार लसीकरण केंद्र होते. या केंद्रांवर ही लसीकरण मोहीम राबवता येऊ शकते. प्रत्येक लसीकरण केंद्रावर दिवसाला १०० ते १५० नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना  

 

लसीचा एकच डोस पुरेसा!

येत्या काळात कोविशिल्ड या लसीचा फक्त एकच डोस दिला जावा यावर चर्चा सुरू आहे. लसीचा एक डोस करोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी प्रभावी आहे का? याचा अभ्यास केला जातोय. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुतनिक लाइट आणि कोविशिल्ड लस एका पद्धतीने तयार झाली आहे. या स्पुतनिक लाइट आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोन लसी एक डोसच्या आहेत.

 

Advertisement

Advertisement