मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी (दि.३०) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी १५ जूनपर्यंत राज्यात निर्बंध राहणार असल्याचे सांगितले. उद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येणार असून ज्या जिल्ह्यातील परिस्थिती विदारक आहे तिथे कडक निर्बंध लादण्यात येतील असे ते म्हणाले.तर ज्या जिल्हातील परिस्थिती आटोक्यात आली आहे तिथे निर्बंध शिथिल करण्यात येतील मात्र त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी रविवारी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी कोरेानामुळे जी बालके अनाथ झाली आहेत. त्यांच्यासाठी लवकरच एक योजना जाहीर करुन त्यातून त्या बालकांना आधार देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून लवकरच केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारही या बालकांसाठी एक विशेष पॅकेज जारी करेल असे ठाकरे म्हणाले. तसेच सध्याची परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली असली तरी संसर्ग पूर्णपणे थांबलेला नाही.
त्यामुळे लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध राहतील. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तिथे हे निर्बंध आणखी कडक राहतील त्यामधे १५ जूनपर्यंत कोणतीही शिथिलता मिळणार नाही असे ठाकरे म्हणाले. ज्या जिल्ह्याची परिस्थिती अटोक्यात आली आहे. तेथील आढावा उद्या घेण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे ते म्हणाले. त्यामुळे आता १५ जूनपर्यंत राज्यात निर्बंध राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आता प्रत्येक गावाने ‘कोरोना मुक्त गाव’ करायचयं याचा संकल्प पाळायला हवा. सरकार राज्यातील जनतेच्या आरोग्याशी या परिस्थितीत खेळणार नाही जनतेनेही सरकारला सहकार्य करावे अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली