मुंबई-राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी धोका अद्याप टळलेला नाही, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच जाहीर केली आहे. राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ३१ मेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
त्यात आता पुन्हा वाढ होणार की निर्बंध शिथिल केले जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समाजमाध्यमांच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी संवाद साधणार आहेत. यात मुख्यमंत्री राज्यातील लॉकडाऊन संदर्भात पुढील माहिती देण्याची शक्यता आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. त्यामुळे सध्याच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या क्षेत्राला दिलासा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.