Advertisement

मुल्यमापन करून विद्यार्थ्यांना करणार पास-वर्षा गायकवाड

प्रजापत्र | Friday, 28/05/2021
बातमी शेअर करा

मुंबई – दहावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून नववी च्या वर्गात असताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व इतर गोष्टी विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाईल असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले .

 

दहावी आणि बारावी परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आम्ही चर्चा केली आहे. दुसऱ्या लाटेत संसर्ग कशापद्धतीने वाढतो आहे हे आपण पाहतोय. यात मुलांना धोका जास्त आहे. तसंच संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाला कोरोनाची राज्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा सांगू. शासनाची भूमिका आम्ही शुक्रवारी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून मांडू. तसंच शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात येईल.”असे मंत्री गायकवाड यांनी म्हटले .

 

दहावीचे मूल्यमापन म्हणजेच विद्यार्थ्यांना मार्क कसे द्यायचे यासाठी राज्य सरकार विविध पर्यायांची चाचपणी करत आहे.यासाठी नववी आणि दहावीच्या शालांतर्गत परीक्षांच्या आधारे दहावीचा अंतिम निकाल जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते. यानुसार, नववीच्या चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा आणि दहावीची चाचणी, तोंडी आणि पूर्व परीक्षेचे मार्क ग्राह्य धरले जाऊ शकतात.दहावीच्या लेखी परीक्षेला – ३० गुण,गृहपाठ, तोंडी परीक्षेला – २० गुण नववीच्या अंतर्गत परीक्षेला – ५० गुण १०० गुणांच्या मूल्यमापन पद्धतीत विद्यार्थी समाधानी नसेल, तर बोर्डाच्या दोन परीक्षांच्या संधी मिळतील अस गायकवाड यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement