Advertisement

मानसिक छळ केल्यानं युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 23/05/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि.२३ ( वार्ताहार )- तालुक्यातील कोळगाव येथील  इंजिनीयरीगचे शिक्षण घेणा-या एका युवतीने मानसिक व शारिरीक छळ होत असल्याच्या कारनाने गळफास लाऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली असुन या प्रकरणी चंकलाबा पोलीस ठाण्यात मयत मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे .

 

     या बाबद  सविस्तर माहीती अशी कि ,मयत मुलगी बीड येथे इंजिनीयरीगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती परंतू सध्या लॉकडाऊन असल्याने ती घरीच असायची आरोपी व त्यांचा मित्र सतत आमच्या घराकडे चकरा मारायचा तसेच माझ्या मुलीला मोबाईलवर बोलायचा तसेच मेसेज कॉल करायचा हा सगळा प्रकार आम्हाला माहित नव्हता परंतू घटनेच्या दिवशी माझी मुलगी एका शेतात जात आहे असे मला एकाजनाने सांगितले मग आम्ही दोघेजन मोटारसायकलवर शोधाशोध करत होतो परंतू बालाजी कंराडे यांच्या शेतात लिंबाच्या झाडाला मृत अवस्थेत मुलगी आढळुन आली तिचा मोबाईल फोन आरोपी यांनी काढून घेत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तसेच एकमेकांना बोलत असतानां आरोपी म्हणत होते की हीला इंथुन घेऊनजाऊ व दवाखान्यात नेवुन कोरोनाने मेली असे भासवु अशी तक्रार पीडित मुलीच्या वडिलांनी चंकलाबा पोलीसांत दिली असुन त्याच्या तक्रारीवरून आरोपी १ ) आबासाहेब मुक्तीराम मदने २) अशोक भागवत पांगरे ३ ) शहादेव महादेव लकडे यांच्याविरूद्ध कलम ३०६ , ३४ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

 

 

 

गुन्हा दाखल करण्यासाठी चंकलाबा पोलीसांची टाळाटाळ 
संबधीत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आले परंतू गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ करत होते पोलीस उपविभागीय अधीकारी यांच्याकडे गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे .

 

 

आरोपी अद्याप मोकाटच 
गुन्हा दाखल होऊन काही दिवस लोटले तरी अद्याप पर्यंत आरोपीला चंकलाबा पोलीसांनी अटक केली नाही पोलीसच आरोपीला यातुन मार्ग कसा काढायचा हे सांगू लागल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईक यांनी केला असुुन संबधीत प्रकरणात चंकलाबा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक हे आरोपीला मदत करत असल्याने त्यांची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे .

Advertisement

Advertisement