दिल्ली : खताच्या वाढविलेल्या किंमतीवरुन देशभरात शेतकर्यांमध्ये आक्रोश व्यक्त होत असतानाच बुधवारी केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक वापर असलेल्या डीएपी खतासाठी आता शेतकर्याला पहिल्या इतकेच म्हणजे 1200 रुपयेच मोजावे लागणार आहेत. यासाठी केंद्र सरकारने कंपनीला दिली जाणारी सबसीडी तब्लब 140 टक्क्यांनी वाढविली आहे. प्रजापत्रने आजच खताच्या किमती कमी होणार असल्याचे वृत्त दिले होते.
खत उत्पादक कंपन्यांनी रसायनांचे भाव वाढल्याचे सांगत खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली होती. यावरुन देेशभर शेतकरी संताप व्यक्त करत होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी केंद्र सरकारने खताच्या किमती कमी ठेवण्यासाठी अनुदान वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. डीएपी या खताचा सर्वाधिक वापर होतो. त्यावर उत्पादकांना तब्बल 1200 रुपये अनुदान देऊन शेतकर्यांना पूर्वीच्याच किमतीत हे खत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर डीएपीसाठी 2400 रुपये मोजावे लागणार होते. आता मात्र पूर्वीच्याच किंमतीत म्हणजे 1200 रुपयात डीएपी मिळणार आहे.
बातमी शेअर करा