Advertisement

गुजरातसाठी मोदींकडून १ हजार कोटी तर इतर राज्यातील मृतांच्या नातेवाईकांना केवळ २ लाख

प्रजापत्र | Wednesday, 19/05/2021
बातमी शेअर करा

मुंबई-तौते चक्रीवादळाचा गुजरातच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या वादळग्रस्त भागासाठी तब्बल १ हजार कोटींच्या तातडीच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. याशिवाय देशभरात तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना केवळ २ लाख रुपये तर जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान गुजरातसाठी १ हजार कोटी इतर राज्यातील जनतेसाठी केवळ २ लाख आणि ५० हजारांची मदत करण्यात आल्याने मोदींवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. 

 

              गुजरातसोबतच महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना देखील तौते चक्रीवादळाचा फटका बसला. मात्र मोदींनी गुजरातसाठी १ हजार कोटींचे पँकेज तातडीने जाहीर केले तर इतर राज्यासाठी मात्र हात आखडता घेतला.. त्यामुळे देशात ज्या ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा फटका बसला आहे, तिथे मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये तर जखमींसाठी ५० हजार रुपयांच्या मदतनिधीची देखील घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

Advertisement

Advertisement