मुंबई-देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सेक्रेटरी आणि IIT कानपूरचे सीनियर प्रोफेसर डॉ. आशुतोष शर्मा म्हणाले की, डिसेंबरपर्यंत देशात हर्ट इम्यूनिटी तयार होईल. तेव्हा 60 ते 70% लोकसंख्येत अँटीबॉडी डेव्हलप होतील. यामुळे संक्रमणाच्या ट्रान्समिशनचा वेग खूप कमी होईल. प्रो. शर्मा म्हणाले की, जर सर्व काही नियोजनानुसार सुरू राहिले तर देश लवकरच महामारीवर विजय मिळवेल.
प्रो. शर्मा म्हणाले की,परिस्थिती अशी आहे की लसीकरणानंतरही लोकांना मास्क घालावे लागतील. सध्या, विषाणूचे वेगवेगळे म्यूटेंट येत आहेत. मागच्या लाटेमध्ये एक्सपर्ट्स आणि प्लानिंग कमिटीला याचा अंदाज घेता आला नाही. म्हणूनच दुसरा टप्पा अधिक धोकादायक बनला आहे. आता आपण सर्वांनी भविष्यासाठी सावध राहिले पाहिजे. आपले भविष्य आपल्या वर्तनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. मास्क, सोशल डिस्टेंसिंग, लसीकरणाची भूमिका खूप जास्त आहे.गेल्या 24 तासांच्या आत देशात 3.10 लाख लोकांना कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. हा आकडा गेल्या 25 दिवसांमध्ये सर्वात कमी आहे असे ते म्हणाले.