Advertisement

‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा-जे.डी.शाह

प्रजापत्र | Thursday, 13/05/2021
बातमी शेअर करा

बीड दि.१३ (प्रतिनिधी)-आजच्या रमजान ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.तसेचरमजान ईदच्या औचित्यावर गळाभेट-हस्तांदोलन करत ‘ईद मुबारक’ची शुभेच्छा देण्याची प्रथा आहे,मात्र यावर्षी ही प्रथा पाळू नये, असे आवाहन धर्मगुरूंसह जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासनाकडूनही करण्यात आले असून ‘ईद मुबारक’ म्हणा, पण गळाभेट अन् हस्तांदोलन टाळा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जे डी. शाह यांनी देखील केले आहे. 
        प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी नागरिकांनी आपआपसांत ‘डिस्टन्स’ ठेवणे बंधनकारक आहे. ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्याकरिता हस्तांदोलन व गळाभेट पुर्णपणे टाळावी जेणेकरून कोरोनाच्या संक्रमणाचा धोका निर्माण होणार नाही. आज शुक्रवारी साजरी होणाऱ्या रमजान पर्व कोरोनाच्या सावटाखाली पार पडले जाणार आहे. रमजान ईदच्या सणावरही कोरोनाचे सावट आहे. यामुळे सामुहिक नमाजपठणाचे ठिकठिकाणी होणारे सोहळेही रद्द करण्यात आले आहे.  ईदची स्पेशल डिश ‘शिरखुर्मा’चा आस्वाद आपआपल्या घरी कुटुंबियांसोबतच घ्यावा लागणार आहे. मित्र-परिवार, नातेवाईकांच्या घरीदेखील नागरिकांना ये-जा करणे अवघड होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा आजार टाळण्यासाठी नागरिकांना यंदा ईद आपल्या घरीच राहून साजरी करणार आहे.  यंदाची ईद मुस्लीम बांधवांना अगदी साधेपणाने साजरी करण्याचा सामुदायिक निर्णय घेतला आहे. तसेच किराणामध्ये काही प्रमाणात सुकामेवा खरेदी करून दुधाच्या सहाय्याने पारंपरिक प्रथेनुसार ‘शिरखुर्मा’ तयार करून घरांमध्ये ईदची नमाज पठण केले जाणार आहे. यावर्षी ईदच्या खरेदीला नागरिकांनी प्राधान्य दिलेले नाही. नवीन कपडे, पादत्राणे, सौंदर्य प्रसाधने आदी वस्तूंच्या खरेदीला फाटा देत त्यावरील खर्चाची रक्कम गोरगरीब व समाजातील गरजू घटकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला  आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था व दानशूर राज्यासह बीड  शहरांमध्ये पुढे आल्या अशी माहिती जे डी शाह यांनी दिली आहे.कोरोना आजाराचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता  साधेपणाने  साजरी होणार आहे .नागरिकांनी कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी लॉकडाउनचे नियम पाळावेत. ईदच्या शुभेच्छा देताना अलिंगण व हस्तांदोलन शक्यतो टाळावे, जेणेकरून कोरोनाचा धोका उद्भवणार नाही. आपआपल्या घरांमध्येच राहून नमाजपठण करावे.असे  असे विनंती वजा आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते जे डी शाह यांनी पत्रात शेवटी केले आहे.

 

Advertisement

Advertisement