Advertisement

वाळू माफियांनी चक्क तहसील कार्यालयातून पळविला ट्रक

प्रजापत्र | Tuesday, 04/05/2021
बातमी शेअर करा

गेवराई-महसूल पथकाने वाळूचा ट्रक पकडल्यानंतर तो तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला होता.मात्र मंगळवारी (दि.४) ट्रक चालकाने तहसील कार्यालयात येऊन येथील कर्मचारी आर.बी.अंमलेकर आणि तहसिलदार यांचे वाहन चालक सत्तार शेख यांना मारहाण करत त्यांच्याकडून ट्रकची चावी घेत वाळूची ट्रक पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.४) दुपारी १२ च्या सुमारास घडली.या घटनेमुळे खळबळ उडाली असून गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  
                         तीन दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक (एम.एच.११ ए.सी.५५९३) महसूलच्या पथकाने पकडला होता.यावेळी ट्रक चालकाला रॉयल्टीच्या पावतीची मागणी केली असता त्याने पावती नसल्याचे सांगितले.त्यानंतर हा ट्रक तहसील कार्यालयात आणून लावण्यात आला होता.याप्रकरणी ट्रक मालकाला १ लाख ८६ हजार ५२८ रुपयांच्या दंडाची नोटिस बजावण्यात आली होती.मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास ट्रक चालकाने मद्यपान करून तहसील कार्यालयात धुडगूस घातला.यावेळी आर.बी.अंमलेकर आणि तहसिलदार यांचे वाहन चालक सत्तार शेख यांना मारहाण करून त्यांच्याकडून ट्रकची चावी घेत पण काढला.दरम्यान ही घटना तहसीलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

Advertisement

Advertisement