Advertisement

धक्कादायक! जिल्ह्यात तब्ब्ल इतके रुग्ण 

प्रजापत्र | Tuesday, 13/04/2021
बातमी शेअर करा

 बीड – जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा गेल्या  दोन, तीन दिवसांपासून कमी जास्त होत आहे. जिल्हावासियांनी काळजी घेतली नाही तर अवघड परिस्थिती होईल असे चित्र आहे.  कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून शहरी भागासोबत ग्रामीण भागातही कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.  मंगळवारी (दि.१३) आरोग्य विभागाच्या अहवालात १०१८  पॉझिटिव्ह आले आहेत. तर निगेटिव्हची संख्या ३१६५ च्या घरात आहे. 

 

 

  आजच्या पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई  २४३,  आष्टी ९८,  बीड  २१६, धारूर २८, गेवराई  ५० ,केज ११९, माजलगाव ३४, परळी १४०, पाटोदा ५६, वडवणी  १४ तर  शिरूरमध्ये   वीस रुग्ण आढळून आले.

 

 

 

 

आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी प्रशांत घनश्याम धस या शेतकऱ्यांच्या काकडीला कमी भाव मिळत असल्याने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे.
शेतकर्‍याने जगायचे कसे हा प्रश्न पुन्हा लॉकडाऊनमुळे  ऐरणीवर आला आहे.

व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा. 

https://youtu.be/7VP_Yw5RqSM

 

Advertisement

Advertisement