Advertisement

महसुलच्या गाडीला धक्का देऊन वाळू माफियांनी टिप्पर पळविले

प्रजापत्र | Saturday, 10/04/2021
बातमी शेअर करा

गेवराई दि १०- अवैध वाळु वाहतूक रोखण्यासाठी गेवराई महसुलचे पथक पाडळसिंगी टोलनाक्यावर वाळुच्या गाड्यांची चेकिंग करत असताना एका हायवाकडे वैधता संपलेली पावती मिळून आली. तो हायवा कारवाईसाठी गेवराई पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना वाळु माफियांनी मंडळ अधिकार्‍याच्या गाडीला धक्का देऊन तो हायवा घेऊन फरार झाल्याची घटना काल रात्री घडली.

 

     गेवराईचे तहसीलदार सचीन खाडे, मंडळ अधिकारी अमोल सुधाकर कुलुरकर हे पाडळसिंगी येथील टोल नाक्यावर वाळुच्या गाड्यांची चेकिंग करत होते. या वेळी रात्री साडे आठ वाजता गढीकडून बीडकडे एक टिप्पर वाळु घेऊन जात असताना त्यांनी अडवले.

 

 

. त्यावेळी चालकाकडे पावतीची विचारणा केली असता त्याने मुदत संपलेल्या पावत्या दाखविल्यावरून अवैध वाळु होत असल्याने त्यांनी त्या टिप्परवर कारवाई करण्यासाठी गेवराई ठाण्याकडे टिप्परकडे घेऊन जात असताना तेथे स्कॉर्पिओ (क्र. एम.एच.२३ ए.डी. ५९९०) यामधून शेख जुनेद चांद (रा. माळापुरी) हे तिथे आले व ते टिप्पर माझे आहे, असे मंडळ अधिकारी यांना म्हणू लागले. त्याचवेळेस हायवा (क्र. एम.एच. २३ यू. ४२९९) च्या चालकाने हायवा तेथून पळवला. मंडळ अधिकार्‍यांनी त्या हायवाचा पाठलाग केला असता हायवा चालकाने त्यांच्या गाडीला जोराची धडक देऊन ते फरार झाले. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात कलम ३०७, ३५३, ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास गेवराई पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement