बीड दि.30 (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढू लागली असून गुरुवारी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यातील परळीत सर्वाधिक 17 रुग्ण सापडले असून जिल्ह्यात 394 सक्रिय रुग्ण झाले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या 700 पार गेली असून हा आकडा मागील काही दिवसात झपाट्याने वाढला आहे. काल 58 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडली होती त्यानंतर आज 37 रुग्ण आढळले. सध्या बीड जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 394 झाली असून मृतांचा आकडा 26 च्या घरात आहेत. नवीन रुग्णांमध्ये बीडमधून 10, परळी 17, अंबाजोगाई 4, गेवराई 2, माजलगाव 2, आष्टी 1, केज 1 असे आहेत.
बीडमधील 10 रुग्णांमध्ये गणेशनगर 2, विप्रनगर 1, धानोरा रोड 1, जुना बाजार 1, शुक्रवार पेठ 2, खासबाग देवी 1, भगवान प्रतिष्ठाणजवळ 1, काळे गल्ली मध्ये 1 रुग्ण आढळला आहे. 
तर परळीत बँक कॉलनी 1, विद्यानगर 2, टिपीएस कॉलनी 2, आयोध्यानगर 1, इंडस्ट्रीयल भाग 3, माणिक नगर 2, जलालपूर रोड 1, धर्मापूरी 2, टोकवाडी 1, हमालवाडी 1 व अन्य भागात 1 कोरोनारुग्ण आढळून आला आहे. तसेच अंबाजोगाईत 4 रुग्ण आढळले असून झारे गल्ली 2, अनुराग गल्ली 1, बलुतेचा मळामधील 1 जण सापडला आहे. गेवराईतील दोन रुग्णांमध्ये मोंढा रोड 1 आणि मोमीन गल्लीतील 1 जणाचा समावेश आहे. तर माजलगावातील दोन रुग्णांमध्ये वैष्णवी मंगल कार्यालय आणि नवनाथ नगर येथील समावेश असून आष्टीतील एक रुग्ण डोईठाण तर केजचा एक रुग्ण भवानी चौक धारुर रोडवरील आहे.


                                    
                                
                                
                              
