परळी – जिल्ह्यातील वाढता कोरोना बघता महाशिवात्रीला बंद केलेले परळी येथील वैद्यनाथ मंदिर दर्शनासाठी 4 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आहेत राज्य शासनाने लागू केलेल्या नियमावली नुसार बीड चे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी महाशिवात्रीला काही दिवस जिल्ह्यातीलच सर्व मंदिर बंद करण्याचे आदेश दिले होते .त्यानंतर पुन्हा काही दिवस हे मंदिर न उघडण्याचे आदेश दिले होते .
दरम्यान जगताप यांनी पुन्हा नव्याने आदेश काढत वैद्यनाथ मंदिर 4 एप्रिल पर्यंत मंदिर आणि दर्शन बंद राहील असे म्हटले आहे .कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी प्रशासन ज्या उपाययोजना करत आहे त्याचे जनतेने पालन करावे असे म्हटले आहे .
बातमी शेअर करा