Advertisement

धारूरमध्ये पुन्हा अपघात ; एक जागीच ठार

प्रजापत्र | Saturday, 13/03/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.13  - गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच असून काल शुक्रवारी सकाळी कार व दुचाकीचा अपघातात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना घडली होती. तेच शुक्रवारी मध्यरात्री शहरातील माजलगाव रोडवर एस्सार पेट्रोल पंपाजवळ एका पादचाऱ्यास कारने उडवून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

आरणवाडी जवळील घाटात शुक्रवारी सकाळी कारने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर तीन जखमी झाले. घटनेला काही तास होत नाही तोच रात्री शहरात एक अपघात झाला. किल्ले धारूर  शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548 सी  वर एस्सार पेट्रोल पंपाजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. रस्त्यावर चालणाऱ्या सुरेश माणिक माळेकर (29) रा. गोपाळपूर या व्यक्तीचा कार (क्र एम.एच 23 एडी 0143) खाली येवून मृत्यू झाला. सदरील अपघाताबाबत पोलिसात  गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु आहे.
राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर अंबेवडगाव येथे दि.4 मार्च रोजी पहाटे कार व ट्रॅक्टरचा अपघात  होवून एक तरुण ठार झाल्याची तर  परवा दि.11 गुरुवारी तेलगाव येथे बीड परळी रस्त्यावर एका महिलेस ट्रकने चिरडल्याची घटना घडली होती. यात आज पुन्हा एक अपघात घडला असून तालुक्यात अपघाताची मालिका सुरुच आहे.

Advertisement

Advertisement