बीड-येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धारूरमधील समाजसेवक असलेल्या इंजि.सादिक इनामदारवर विनयभंग,अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात अनेक प्रकरणे उघडकीस आणण्यात सादिक इनामदार यांचा मोठा वाटा होता. अनेक भ्रष्ट प्रकरणात आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्यांनी धडा शिकवला होता. जिल्हा परिषदमधील ही शिक्षण विभागाच्या गैरकारभाराची त्यांनी चौकशी लावली होती. बुधवारी दिलेल्या तक्रारी नुसार सादिक इनामदार यांनी महिलेच्या कक्षात जाऊन अरेरावी व असभ्य वर्तन,विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.त्यानुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते. दरम्यान या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून सादिक इनामदार हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ही आहेत.
बातमी शेअर करा