परळी – तीन ते चार महिन्यापासून वेतन थकल्याने भाजप नेत्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या ताब्यातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना बंद करून गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे . भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी यावर्षी शेतकरी आणि कामगारांच्या मदतीने मोठ्या उत्साहात कारखाना सुरू केला होता .कारखान्याने दोन अडीच लाख साखर पोते देखील उत्पादित केले होते .
दरम्यान कारखाना सुरू असताना देखील कामगारांना चार महिन्यापासून वेतन न मिळाल्यामुळे कामगारांनी बुधवारी सकाळी कामबंद आंदोलन करत कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे .
बातमी शेअर करा