Advertisement

राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्कार जे.डी.शाहांना प्रदान

प्रजापत्र | Saturday, 27/02/2021
बातमी शेअर करा

गेवराई-तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सुवर्ण अक्षराने लिहिण्याची वेळ आली आहे कारण जे का रंजले गाजंले त्याशी म्हणे जो आपुले हे बिद्र वाक्य समोर ठेवून संत महंतांचा वारस चालविणाऱ्या संघर्ष सामाजिक धान्य बैंकेकडुन माझ्या कर्म आणि जन्मभूमीच्याच माणसाने माझ्यासारख्या असामान्य सामाजिक कार्यकर्त्यांची छोट्याशा कार्याची दखल घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या नावाने हिमालयाच्या उंची एवढा  सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले हा जन्मभूमी चा पुरस्कार हा सर्वश्रेष्ठ सन्मान  असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते जे. डी. शाह यांनी व्यक्त केले आहे .
        संघर्ष सामाजिक धान्य बँक तर्फे आयोजित राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवारत्न पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
 मानवता हीच खरी सेवा अशी शिकवण देणारे थोर संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिवशी संघर्ष धान्य बँक गेवराईच्या वतीने गेवराई तालुक्यातील जेष्ठ समाजसेवक जे.डी.शाह यांच्या सह एकुण ११ समाजसेवकांचा सेवा रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सेवाक्षेत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून इन्फंट इंडिया पालीचे संस्थापक दत्ता बारगजे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून झुंबरलाल खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड,बीड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती  पंढरीनाथ लगड,आधार प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण कुमार काळम पाटील, बालग्रामचे संस्थापक संतोष गर्जे,  श्री संध्या बारगजे व पोलीस निरीक्षक संदीप काळे हे होते

 

यावेळी  राष्ट्रसंत गाडगे महाराज सेवा रत्न पुरस्काराला उत्तर देताना जेष्ठ समाज सेवक जे.डी.शाह म्हणाले की सध्याचा काळ हा मी मला आणि  माझा या स्वार्थी हिताने ग्रासलेला आहे  समाजा मध्ये अनेक दिन दलित पद दलित असे अनेक घटक उपेक्षित, दुर्लक्षित वंचित आहे. सुर्य चंद्रा सारखे महापुरुष आमच्या डोक्यावर असतांना आज समाजात माणुसकीचा अंधार का पसरलेला याचं आत्मचिंतन करण्याची नितांत गरज आहे कारण त्यावेळेच्या संतांने म्हटले आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेची जाणावा पण सध्याच्या समाजाचे चित्र पाहिल्यावर सर्व सामान्य माणसांची होमारी लुट लक्षात घेता असे म्हणावेसे  वाटते की ज्याने लुटले लाटले त्यासी म्हणु नव्हे आपुले डाकु तेथेची ओळखावा हरामी तेथेची जाणावा असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे कारण विधवा महिलांची पगार नवऱ्या वाली महीला खायाला लागली ,ट्रक्टर मालकांचं नाव दारिद्रय रेषेखाली आहे चालकांचं नाव नाही त्यामुळे गरीब दुखी आहे. ते सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे आशेने पाहत आहे म्हणून जिवन जगताना माणूस किती जगला, किती मुलांचा बाप झाला, किती संपत्तीचा मालक झाला जिवनात किती पदांवर गेला याला महत्त्व नसुन तो जिवनात दुसऱ्यासाठी किती जगला याला फार महत्त्व आहे असे सांगून पुढे म्हटले की मानवाचा ज्या वेळेस जन्म होतो त्यावेळी नाव नसतं पण श्वास असतो मात्र मृत्युच्या वेळी श्वास नसतं पण नाव असतं म्हणून जिवन जगताना गोर गरीब पिडीतांसाठी प्रत्येकाने आपलं जीवन खर्चीत करण म्हणजे महापुरुषांच्या विचारांवर चालनं आहे कारण कोणत्याही धर्मामध्ये श्रीमंत होवून मला असे सांगितले नसुन इतरांसाठी जगा असे मात्र प्रत्येक धर्मात सांगितले आहे.माणुस कितीही श्रीमंत झाला तरी जाळायला गाडायला तीनच हजार रुपये लागतात याचा भान ठेवनं अत्यंत गरजेचे आहे असे मौलिक विचार मांडुण माझ्या जन्म व कर्म भुमीचा पुरस्कार बळ देणारा असुन यामुळे कठोर परिश्रम , प्रामाणिकणा आणि सामाजिक बांधिलकी हे जीवनाचे तीन प्रमुख आधारस्तंभ समोर ठेवून  आता भविष्यात काम करण्याची फार मोठी जबाबदारी  पार पाडण्याची ग्वाही सामाजिक कार्यकर्ते जे.डी.शाह यांनी शेवटी दिली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे  श्री गौतम खटोड म्हणाले की संघर्ष धान्य बँकेचे काम पाहून मी प्रभावित झालो आहे अशा कामाची खरोखरच समाजाला गरज आहे.दरवर्षी मीसुद्धा या धान्य बँकेत पाच क्विंटल धान्य अविरतपणे देणार आहे. श्री पंढरीनाथ लगड बापू यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की संघर्ष धान्य बँक आता सर्वांची झालेली आहे सर्वांनी त्यासाठी सातत्याने मदत करणे गरजेचे आहे. संघर्ष धान्य बँकेने योग्य व्यक्तींची निवड केल्याबद्दल त्यांनी संघर्ष धान्य बँकेचे आभार व्यक्त केले. संघर्ष धान्य बँक हा एक विचार आहे आणि तो टिकवणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आदरणीय काळमपाटील साहेब यांनी व्यक्त केले. संघर्ष धान्य बँकेच्या सर्व संचालकाचे त्यांनी कौतुक केले. संघर्ष धान्य बँकेसारख्या संस्था समाजात काम करत आहेत म्हणून आम्हाला कुठलीही मदत तत्पर मिळते असे प्रतिपादन आदरणीय संतोष दादा गर्जे यांनी केले. सपोनि श्री संदीप काळे सर यांनी सर्व समाजरत्नांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या  अध्यक्षीय भाषणात  श्री दत्तामामा बारगजे यांनी जेष्ठ समाजसेवक जे. डी. शाह  गौरव करतांना म्हणाले की यांची सामाजिक बांधिलकी मी अठरा वर्षांपुर्वी जिल्हा रूग्णालयात नोकरी असतांना रक्तदाब शिबीरे रुग्ण सेवा प्रत्यक्ष पाहिली आहे. त्यांना पुरस्कार देतांना मला खुप आनंद होत आहे अशा भावनात्मक शुभेच्छा  दिल्या  आहे.
सेवारत्न श्री बाळासाहेब दहिफळे , भारत साळुंके,  यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी श्री जे.डी शाह यांच्या सह विविध श्रेत्रात काम करणाऱ्या एकुण अकरा समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी  बाबासाहेब घोडके सरफराज पठाण नानासाहेब पवार समीर शाह तसेच गेवराई तालुक्यातील सर्व शिक्षक, समाजसेवी मंडळी,पत्रकार उपस्थित होते.हा सोहळा जिल्हा परिषद माध्यमिक शाळा गेवराई येथे आयोजित करण्यात आला होता. या दिमाखदार सोहळ्याचे प्रभावी सूत्रसंचालन श्री धर्मराज करपे सर यांनी केले तर आभार बाळासाहेब गावडे यांनी मानले.

Advertisement

Advertisement