बीड-गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर गावातील एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याचा गुन्हा २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घडला होता.याप्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.याप्रकरणाची सुनावणी शनिवारी (दि.२०) न्या.एम.व्ही.मोराळे यांच्यासमोर झाली.सबळ पुराव्याच्या आधारावर आरोपीला न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे.
आरोपीने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी पीडितेच्या घरी जात तिच्या आईला 'तुमच्या मुलीला बोकडाला औषध लावण्यासाठी घेऊन जातो असे सांगत' पीडितेला आरोपी स्वतःच्या घरी घेऊन गेला.यानंतर घराचा दरवाजा आतून लावून घेत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर तलवाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.याप्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर.आर.गढवे यांनी करून आरोपीविरोध अंतिम दोषारोपपत्र सादर केले.सदर प्रकरणाची सुनावणी न्या.एम.व्ही.मोराळे यांच्यासमोर झाली.यावेळी सबळ पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने ३७६ (२),५११ भादंवि व ९ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत दोषी करून पाच वर्ष सश्रम कारावास व पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाची बाजू मंजुषा दराडे यांनी मांडली.तर पैरवीचे कामकाज व्ही.डी.बिनवडे व सी.एस.नागरगोजे यांनी पहिले.
बातमी शेअर करा